Chembur Trombay Education Society's
N. G. Acharya & D. K. Marathe College
of Arts, Commerce, Science & Professional Courses [ NAAC Accredited, 'A' Grade, CGPA 3.19 ]
Late Shri. Sharadbhau Acharya Vyakhyanmala
:::Home » Events » Late Shri. Sharadbhau Acharya Vyakhyanmala

Late Shri. Sharadbhau Acharya Vyakhyanmala

 स्व. श्री.शरदभाऊ आचार्य व्याख्यानमाला

*

ना. ग. आचार्य व दा. कृ. मराठे महाविद्यालयाचे संस्थापक सदस्य मुंबईचे माजी महापौर, चेंबूरमधील ज्येष्ठ सामाजिक नेते स्व. श्री. शरदभाऊ आचार्य यांच्यास्मृतिप्रीत्यर्थ  महाविद्यालयात या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.दरवर्षी जानेवारी महिन्यातसलग दोन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांशी संबंधित सुप्रतिष्ठित वक्त्यांची समकालीन विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्याने संपन्न होतात.२०१२ पासून सलग पाच वर्षेचालू असलेला व प्रसारमाध्यमांमध्येही दखलपात्र ठरलेला उपक्रम आहे.

            विचारवंतांचे विचार ऐकणे व त्यावर चर्चा करणे हे या उपक्रमामागचे मुख्य सूत्र आहे.श्री.निळू दामले, श्री.हरिश सदानी, डॉ.रामदास भटकळ, प्रा.नीतीन रिंढे,प्रा.दाऊद दळवी, कॅ.धनराज वंजारी, श्रीमती नंदिनी आत्मसिद्ध, प्रा. मोहन आपटे, श्री.बाळ फोंडके इ. मान्यवर वक्त्यांनी या व्याख्यानमालेत आपले विचार व्यक्त केले आहेत.

            व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापक, तसेच मुंबई व परिसरातील अनेक मंडळींसाठीही वैचारिक पर्वणी असते.

० ० ०

            Events
  • Tarunotsav
  • Arthamanthan
  • Techage
  • Phoenix
  • Pixel
  • Late Shri. Sharadbhau Acharya Vyakhyanmala